Friday, August 15, 2014

पुरस्कार...

काही दिवसांपूर्वीचा प्रसंग...खुप दिवसांनी जळगाव ला आम्ही मित्रमंडळी एकत्र जमलो होतो .साहजिकच एम जे तील जुन्या आठवणींनी,उपस्थित असलेल्या,नसलेल्या मित्रांच्या – मैत्रिणींच्या धमाल किस्सानी मैफिल चांगलीच सजली होती.त्या मैफिलीत एका मित्राने तो ‘बाप’ झाल्याची गोड बातमी दिली.मुलाचे नाव काय ठेवावे याबाबत त्याने विषय काढला.आमच्या कडून काही नवीन,विशेष अन वैशिष्टपूर्ण नाव मिळेल ही त्याची अपेक्षा होती.अनेक नावे आम्ही त्याला सुचवली,पण हवे असणारे नाव त्याला त्यातून काही गवसले नाही.शेवटी तो मित्रच म्हणाला “नाहीतर ‘भारतरत्न’ हेच नाव ठेवतो.‘भारतरत्न *** ***’.”त्यावर आम्ही खुप हसलो व त्या नावासाठी मित्राला शुभेच्छा देवून आमची मैफिल आटोपती घेतली.... भारतरत्न पुरस्कारबाबत होणारी चर्चा ज्या दिशेने जात आहे त्यावरुन ‘भारतरत्न’ पुरस्काराला आपण गल्लीतील एखाद्या संस्थेद्वारे हेतूपुरस्कर दिल्या जाणार्या पुरस्काराच्या रांगेत बसवतो आहे की काय हि शंका घ्यायला तेथे बराचसा वाव आहे.एखादा पुरस्कार म्हणजेच कार्याला मान्यता या समाजात रुजू होऊ पाहणार्यार सामाजिक प्रवृत्तीतून पुरस्कारांना आम्ही बाजारपेठेत घेवून आलो आहे.त्यामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा जपण्याचे भानही आम्ही ठेवत नाही. भारतरत्न कुणाला द्यावा हा नेहमीच वाद – विवादाचा विषय राहिलेला आहे.वास्तविक पाहता या महान व्यक्तींचे कार्य एखाद्या पुरस्काराने मोजताच येत नाही.या सर्व व्यक्ती पुरस्कारापलीकडे गेलेल्या असतात.परंतू आमचे राज्यकर्ते राजकारणापलीकडे विचार करताना दिसत नाही,म्हणूनच सरकारची विचारसरणी या व्यक्तींच्या निवडी मध्ये डोकावते हे मात्र उघड सत्य आहे व हे आपल्या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.आपणही अशा सावळ्या चर्चेत त्वेषाने ,चवी ने सहभागी होतो,सज्ज होतो आपल्या आवडत्या तसेच जाती धर्माच्या व्यक्तीला,नेत्याला,महात्म्याला ‘भारतरत्न’ मिळावा ही मांगणी करण्यासाठी....यातून अनेक ‘भारतरत्न’ भारतात निर्माण होतील तुम्हा –आम्हाला प्रेरणा देण्यासाठी..??????

Sunday, August 3, 2014

रम्याविषयी...

काही लोकांमध्ये उपजतच काहीतरी असत कि त्यांना सर्वजण आपला ‘मित्र’ समजतात ...यामध्ये हक्काने बसणारा म्हणजे रम्या ...रमेश होलबोले..अनोळखी व्यक्ती हि याच्याशी बोलेल तर त्यालाही वाटत आपण आपल्या एखाद्या जुन्या मित्रासोबतच बोलतो आहे .हेच तर रम्या च सर्वाधिक महत्वाचे वैशिष्ट...त्याची अन माझी भेट सुध्दा याच थाटात झाली ,पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेल क्रमांक ५ च्या रूम नंबर ३६ मध्ये ..तो आणि मी शेजारी – शेजारी...मी आणि माझा एक मित्र खुप उचापती करत राहायचो .माझ्या रूम मध्ये आमचा एक पत्रकार मित्र पण असायचा. तो दररोज सकाळी फोन करून त्याच्या मैत्रिणीला गुड मॉर्निंग म्हणायचा ,मग काय आम्ही पण त्या मित्रादेखत गुड मॉर्निंग म्हणायचो ,त्यात रम्या हि शामिल व्हायचा .(आता त्या गोष्टीचं हसू अन वाईट वाटतं पण त्या वेळेस मात्र वेगळीच धुंदी होती.) त्या गुड मॉर्निंग च्या चक्कर मध्ये मात्र रम्या आमच्या खुप जवळ आला .माझ्यात आणि रम्यात दोन – तीन गोष्टी बाबत साम्यता होती ती म्हणजे उशिरा उठणे , ‘जयकर’ ला फारसे न जाणे अन अभिजात कला कृती वर (चित्रपट ,नाटक, पुस्तकं व ललित कला केंद्राच्या मुली ..)तासन तास चर्चा करणे .. ‘ललित कला केंद्र’ हा तर आमच्या खूपच जिव्हाळाचा विषय.आम्ही त्याला गंमतीने ‘खोलीत कला’ असे म्हणायचो ...त्यात थोडीशी वास्तविकता ही होती हे मात्र खर. मी आणि रम्या दोघेही एमफिल ला सोबतच होतो .रम्याचा एमफिल चा विषयही भव्य – दिव्य अमेरिकन ब्लॅक थिएटर वर .दोघांनाही हॉस्टेल प्राप्त ..आणि दोघांच्याही रूम वर पॅरासाइड चा भरणा ..धमाल मज्जा यायची त्या दिवसांमध्ये ..दर रविवारी सायंकाळी मेस बंद असायची मग त्या दिवशी खिचडी ...जास्तीचे पैसे असल्यास चिकन बिर्याणी असा आमच्या दृष्टीने फस्ट क्लास बेत ...मग रात्री रम्या च्या पीसी वर चित्रपट ...चित्रपटांना मात्र विषयाचे बंधन नव्हते . या सर्व गोष्टींमुळे रम्या अधिक समजत गेला ,म्हणावं तर अधिकच ‘कळत’ गेला . मध्यंतरीच्या काळात हॉस्टेल ची मुदत संपली .विद्यापीठ तरी काय करणार ..आठ – दहा वर्षापासून विद्यार्थी राहतात तिथ .या हॉस्टेल मधून त्या हॉस्टेल मध्ये ,एका रूम मधून दुसर्याव रूम मध्ये पॅरा साइड असा प्रवास ..त्यासाठी मी पुणे विद्यापीठाला वैयक्तिक धन्यवाद देतो ..अनेक पॅरा साइड घडविले या विद्यापीठाने ..त्याचे मोल नाही ..काही विद्यार्थ्यांना मात्र याची किंमत नाही .एकाने मागणी केली होती म्हणे कि जे दहा वर्षापासून विद्यापीठात राहतात त्यांची विद्यापीठाने कायम स्वरुपी व्यवस्था करावी .खरे – खोटे माहीत नाही ..विद्यापीठाला खुप अनुभवले होते , म्हटले विद्यापीठा बाहेरची दुनिया अनुभवावी...म्हणूनच आम्ही ठरविल आता विद्यापीठाच्या बाहेर राहायचं ....जवळ खुप पैसा होता अस नव्हतच मुळी ...पण बाहेर राहण्याची इच्छा मात्र होती .पाच ते सहा जण एकत्र येऊन महिन्याला ४००० ते ५००० पर्यन्त फ्लॅट करायचा ..फ्लॅट वरच जेवण ..म्हणजे एकाच्या वाटयाला १२०० ते १५०० ...मग फ्लॅट ची शोधाशोध सुरू झाली .बर फ्लॅट विद्यापीठाच्या जवळ असणार्याय एरिया मध्येच असण सोयिस्कर होणार होते म्हणून सांगवीत शोध घेतला ..पण तेथे मात्र काही जुळून आले नाही . शेवटी मोठ्या प्रयत्नाने सोमेश्वर वाडीत फ्लॅट मिळाला आणि फ्लॅट चा शोध एकदाचा तो थांबला .म्हणण्यासाठी आम्ही विद्यापीठाच्या बाहेर राहत होतो पण संपूर्ण दिवसभर डिपार्टमेंट ,अनिकेत ,ओपन , आदर्श अन जयकर ..फक्त झोपण्यासाठी फ्लॅट वर...याच काळात रम्या च्या व माझ्या नेट – सेट च्या वार्यार सुरूच होत्या ..शेवटी सुटलो एकदाचे आम्ही त्या परिक्षेतून ...दोघेही एकाच परिक्षेत पास झालो . रमेश होलबोले...उंची ५’७ ,वर्ण काळा ..दाढीचे खुंठ म्हणता येणार नाही अशी संपूर्ण दाढी..अंगावर सुती कुर्ता ,कधी कधी टी –शर्ट ..खाली जीन्स ..स्ट्यलिस्ट पण त्यातून स्वतचे हसे होणार नाही ...एखादया कलेला जोपासणार्या५ कलासक्त लोकांसारखा ...बोलतांना (समोरचा व्यक्ती पाहुन ) अवगत केलेली पुणेरी मराठी...ओळख सांगण्याची पद्धत ,थोडेसे हसून “मी रमेश होलबोले..गोडबोले नाही होलबोले..गूगल वर सर्च कराल तर फक्त रमेश होलबोले च मिळेल’’ अस काहीस अभिमानाने सांगणे ...पुण्यात राहून पुणेरीपण आत्मसाद केलेला ...शॉर्ट फिल्म ,दिवाळी अंक ,फिल्म फेस्टिवल अशा निमित्ताने काहीतरी चळवळ करित राहणारा रम्या...मित्रांमध्ये संपूर्ण वातावरण ‘बिनधास्त’ करणारा रम्या.... जॉब साठी पुण सोडाव लागलं ...पण आठवणीतील पुण कस सोडता येणार .पुण्याने काय दिले यापेक्षा पुण्याने काय नाही दिले हेच मी स्वतला विचारतो .मुलासारखे प्रेम करणारे गुरु...जिवा भावाचे मित्र ...समृद्ध करणारे अनुभव ...हीच माझी पुण्यातील पुंजी ...माझ्या आठवणीतील पुण्याला सोबत घेऊन मी नागपूर ला निघालो होतो ...नवीन वातावरण ..नवीन मित्र ...नवीन अनुभव अनुभवण्यासाठी .....पण एक सांगू मी अजूनही त्यात रम्या शोधतोय .....