Thursday, July 31, 2014

आठवणीतील काही ....

पुण्याला दुसरी भेट झाली ती एमबीए सीइटी च्या निमित्ताने ...एमबीए बद्दल काय बोलावे...कचरा केला आहे सीस्टीम ने ...अभ्यासक्रम तसा चांगला पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे (चुकीचा हा शब्द वापरला नसता तरी चालले असते ) त्याची पुरती वाट लागली.गल्ली बोळात एमबीए चे कॉलेज झाले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. विद्यार्थ्याचा बोर बार्याी...पण त्यावेळेस मात्र क्रेझ होती त्या फसव्या दुंनियेची..आम्ही विद्यार्थी स्वप्न रंगवित होतो त्या कोर्पोरेड वल्ड चे ..आता मात्र वाटते बर झाले एमबीए केले नाही .. ....पोहचलो पुण्यात ...म्हटलं आता तरी आवडेल पुणे...कारण पुण्यातील पहिल्या भेटीचा अनुभव फारसा काही चांगला नव्हता...भारती विद्यापीठ सेंटर होत एक्झॅम च ...मी मात्र पुणे विद्यापीठात मित्राकडे थांबलो होतो .मित्रानेच भारती विद्यापीठात कसे जायचे ते सांगितले..आधी स्वारगेट ..तेथून कात्रज ..अन शेवटी भारती विद्यापीठ .भव्य दिव्य असे भारती विद्यापीठाचे ते गेट ..चकाचक असे भारती विद्यापीठ (पतंग रावांची कृपा दुसरे काय )...एकदाची सुरू झाली परीक्षा ..काही वेळ डोक घासून पाहिले पण प्रश्नाच अन वेळेचे गणित जमत नव्हते.मग मात्र ठरविले आता फक्त गोल करायचे बस.. पंधरा मिनिटात सर्व गोल करून मोकळा झालो ..मध्यंतरी पेपर सोडविताना एक – दोन मुलींनी एक्सामिनर ला सफाईदार इंग्लिश मध्ये काहीतरी विचारले ..मी म्हटलं आपले मराठी ही एवढे सफाईदार नाही आणि ह्या इंग्लिश मध्ये फडफड करताहेत..अशा पुण्यात कसा निभाव लागेल आपला ...मनात एक निराशा.. एकदाचा संपला पेपर..आलो परत पुणे विद्यापीठात मित्राकडे..मग त्याच्या सोबत जेवण ...गप्पागोष्टी ..आणि त्यानंतर रात्रीचा जळगाव कडे परतीचा प्रवास ...म्हटलं या भेटीतही पुण काही ‘आपल’ झाल नाही ....

आठवणीतील काही....

एकदा कुठेतरी एकले होते..आजकाल ज्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे असे चरण तरी उरले कुठ ,परंतु सर मी मात्र याबत खरच अभागी नाही. पुणे, विद्येचे माहेरघर.जळगावला शिकत असताना एकदा एका कामानिमित्त पुण्याला आलो .ती माझी पुणे शहराशी पहिली भेट आणि या पहिल्या भेटीतच मी गांगरून गेलो .पुण्यात त्या दिवशी पुणेरी पाऊस पडत होता .हो पुणेरी पाऊस च .येथील पाऊस पण पुणेरी लोकांसारखा वैशिष्ट्यपूर्ण....पडतो न पडतो असा सतत अन रिमझिम ...मग काय त्या रिमझिम पावसातच याला विचार – त्याला विचार असे करत धावपळत पीएमटी मधून चिंब झालेल्या पुण्याचे दर्शन. गच गर्दीने भरलेली ती पीएमटी ,त्यात सर्वच वयाचे प्रतिनिधित्व करणारे पुणेरी प्रवासी पण विशेष भावल्या अर्थातच पुणेरी तरुणी. मुळा – मुठे वर असणार्याि पूलांवरून ती पीएमटी किती वेळा गेली मलाही माहीत नाही .सर्वच पूल एकसारखे वाटत होते .त्यामुळे माझ्या गोंधळात अधिकची भर झाली . एकदाचे काम संपले अन पुण्याला हात जोडूनच रात्रीच्या रेल्वेने जळगावच्या दिशेने प्रस्थान केले ते पुण्यात परत न येण्यासाठीच . सकाळी सकाळी जळगावला पोहचलो . रेल्वे स्टेशन वरून थेट एमजे होस्टेल च्या रूम नंबर 12 मध्ये.. सारे मित्र अजुनही बिछ्याण्यात पडलेले होते .त्यांनी विचारले “कस वाटलं रे पुण” .मी म्हटलं “जाऊ द्या ना यार ....??????? करून आलो पुण्यात ...” खरच पुणे अस आहे का ? नंतर ज्या शहराच्या प्रेमात मी पडलो ,जे शहर माझ दुसरे ‘घर’ झाले ,अस माझ पुणे , आपले पुणे ....शिवाजी महाराज,पेशवाईचा इतिहास सांगणारे पुणे..स्वातंत्र चळवळीला आपल्या योगदानाने तेवत ठेवणारे पुणे ..फुले ,टिळक ,सावरकर ,चाफेकर ..अश्या अनेक विभूतींच्या स्पर्शाने पावन झालेले पुणे ..मराठी भाषेला समृद्ध करणार्या, सरस्वतांचे अन व्यासंगी वाचकांचे पुणे.’पुणे तेथे काय उणे’ मराठीत या म्हणीची भर घालणार पुणे...कलेला दाद देणार्या कला सक्त लोकांचे पुणे ...आपली संध्याकाळ बालगंधर्व ,गणेश कला ,टिळक मध्ये घालविणार्याच बौद्धिक लोकांचे पुणे..पेन्शनरांचे पुणे ..गल्ली पासून दिल्ली पर्यंत घडणार्यार घटनांना साद – प्रतिसाद देणारे पुणे ..’सांकृतिक राजधानी’ ,‘विद्येचे माहेरघर’ हा वारसा अभिमानाने जपणार पुणे ...रूपाली पासून चितळे पर्यंत आपल्या चवीच्या बढाया मारणार पुणे ...सदाशिव पेठी खोचक लोकांचे पुणे ..बुधवार पेठेबाबत आंबट चर्चा करणारे पुणे...झेड ब्रिज,सारस बाग ,पर्वती ,वेताळ टेकळी ,एलिस गार्डन ..मध्ये एकमेकांना मिठीत घेऊन बसणार्यार तरुण –तरुणींचे पुणे..आयटी ने झपाट्याने बदलत जाणारे पुणे...परंपरा आणि नाविन्य यांची सांगड घालणारे पुणे...स्वप्नं पहायला,धडपड करायला शिकविणारे पुणे..कितीतरी रुपे सांगता येतील या शहराची ... पुणे शहर तुमचा राग करत ..द्वेष करत ...पण खर सांगु यापेक्षा ते तुमच्यावर अधिक प्रेम करत ...मी मागे वळून पाहतो आणि स्वतला विचारतो की, मी पुणेरी का होऊ शकलो ...त्याच उत्तर तीनच शब्दात सापडते सर ‘तुमचे अधिकच प्रेम’.

Tuesday, July 15, 2014

ब्लॉग लिहण्याची प्रेरणा तशी सचिनची...

ब्लॉग लिहण्याची प्रेरणा तशी सचिनची....आमचे लिखाण बंद झाले अन सचिन ने लिखाण सुरू केले ते पण एकदम मनाला भिडणार,वास्तवतेच्या जवळच...पुणे विद्यापीठातील काही आठवणी....म्हणून कागदावर उतरवून काढल्या त्याने....अन आम्हाला त्याच्या लिखाणातील वेगळेपणाची प्रकर्षाने जाणीव झाली. त्याचे बोलणे अन लिहणे एकच झाले म्हणून त्याच्या लिखाणाला वास्तवतेची किनार लाभली आणि त्यातुन व्यक्त झाले आम्ही अन त्याने अनुभवलेले अनुभव....काटेरी तरी पण सोनेरी अनुभव....ते अनुभव ‘वाटता’ येतील पण ‘घेता’ येणार नाही,म्हणूनच त्याचे लिखाण आम्हाला हवेहवेसे वाटत आहे...त्यासाठीच त्याच्या लिहत्या हाताला खूप खूप शुभेछा....